शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
- विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अशी बातमी आली आहे.
- उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ‘गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
- राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी टाइम्स किंवा क्यूएस रैंकिंग प्रणालीत २०० च्या आत असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
- विद्यार्थ्याने कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी / वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र यांपैकी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्यास, त्याला योजनेत सहभागी होता येणार आहे.
हे वाचा: शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं…
त्याचप्रमाणे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
त्यासाठी विद्यार्थ्यांला ९ ऑगस्टपर्यंत https:///fs.maharashtra.gov. in ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.
हे वाचा: Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?
हे वाचा: शासनाचे आदेश लागू, मुलींना मोफत शिक्षण आहे का ? जाणून घ्या नियम व अटी