- एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला.
- हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत.
- २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
- त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातीलच मंगला हायस्कूल येथे झाले.
किती झाल आहे एकनाथ शिंदे यांच शिक्षण
एकनाथ संभाजी शिंदे त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातीलच मंगला हायस्कूल येथे झाले. येथून त्यांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली.
हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले. (Latest Marathi Educational News)
हे वाचा: Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?