- अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आहेत.
- ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
- सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत.
- अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत.
- अजित पवार यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मधील निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे
त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीविषयी जाणून घेऊयात..
अजित पवार: किती झाल आहे अजित पवार यांच शिक्षण
अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार मुंबईत आले. मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला गेले. त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात चांगली प्रगती केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या राजकीय वारशाचा लाभ घेत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.अजित पवार यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या राजकीय अनुभवामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी आणि महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व बनले आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
हे वाचा: किती शिकलेत शरद पवार, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या
हे वाचा: आत्ताच लग्न झालेले अनंत अंबानी तुम्हाला माहीत आहे का त्यांचं किती शिक्षण झालेल आहे…