Maharashtra State Board – Future Explosion
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरळीत सुरू असली तरी एका प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याने वाद निर्माण झाला आहे. विज्ञान विषयाच्या एका प्रश्नपत्रिकेच्या दोन्ही उत्तरांना जादा गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंडळाला पत्र लिहिले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण मिळणे अपेक्षित आहे.
या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा, असे कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
This content is awailabe in other website .