सीईटीकडून २०२४-२५ साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध | The CET has announced the revised exam schedule for the year 2024-25.

  • Post author:
  • Post last modified:March 24, 2024
  • Reading time:2 mins read

Maharashtra State Board

futureexplosion.com

MHT-CET:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) साठी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध (Revised schedule released) करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. MHT CET भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) परीक्षा 22 ते 30 एप्रिल आणि PCM परीक्षा 2 ते 16 मे या कालावधीत होणार आहेत.

पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही श्रेणींसाठी एमएचटी सीईटी परीक्षा 2024 पूर्वी 16 ते 30 एप्रिल दरम्यान विविध तारखांना होणार होती. मात्र, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मुळे MHT CET परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. असे परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे. 

निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठीच्या तारखा जाहिर केल्या आहेत. त्या अनुषंगाने 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत आयोजित निवडणुका पार पडणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकांसह संघर्ष टाळण्यासाठी अनेक राष्ट्रीय-स्तरीय आणि राज्य-स्तरीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

CET च्या  सुधारित तारखाखालील प्रमाणे आहेत 

MHTCET पीसीबी गट : परीक्षा 22 एप्रिल, 23 एप्रिल, 24 एप्रिल, 28 एप्रिल, 29 एप्रिल, 30 एप्रिल रोजी होणार आहेत. पीसीएम गट : 2 मे, 3 मे, 4 मे, 5 मे, 9 मे, 10 मे, 11 मे, 15 मे, 16 मे रोजी.  MAH-AAC CET रविवार, 12 मे , MAH-B.A./B.Sc. बीएड (चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) – सीईटी शुक्रवार, १७ मे, MAH- LL.B.5 वर्षे सीईटी (पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) शुक्रवार, १७  मे, MH- नर्सिंग CET शनिवार, 18 मे , MAH-BHMCT CET बुधवार, 22 मे, MAH-B.BCA/BBA/BMS/BBM-CET सोमवार, 27 मे मंगळवार २८ मे आणि बुधवार, 29 मे २०२४ रोजी होणार आहेत. तर  MAH-PGP-CET/PGO-CET/M.Sc(A & SLP)-CET M.Sc(P & O)-CET तारीख नंतर जाहीर होणार आहे.

© Times Of India
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply