राज्यातील शाळांमध्ये या तारखे पासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम – 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

  • Post author:
  • Post last modified:August 1, 2024
  • Reading time:3 mins read

राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये या तारखे पासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम – 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान – 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्दिष्ट राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात, ज्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि पडताळणी या अभियानादरम्यान केली जाणार आहे. (Latest Marathi Educational News)

  • अभियानांतर्गत या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे असे सांगणयात आले आहे.
  • १) गणवेशाची उपलब्धता.
  • २) प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा.
  • ३) स्वयंपाकगृहाची उपलब्धता.
  • ४) स्काऊट गाइड प्रशिक्षण व तासाचे आयोजन.
  • ५) विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबद्दलचे अंमलबजावणी.
  • ६) वर्गखोल्यांची स्थिती.
  • ७) स्वच्छतागृहाची उपलब्धता.
  • ८) अध्ययन व अध्यापन साहित्य.
  • ९) शाळांमधील इंटरनेट सुविधा.
  • १०) दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती.
  • ११) पुस्तकातील पानांचा प्रभाव उपयोग.
  • १२) विद्यार्थी उपस्थित व आधार नोंदणी.
  • १३) शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती.
  • १४) साहित्याची उपलब्धता.
  • १५) विद्यार्थ्यांची उपस्थिती.
  • १६)आनंददायी शनिवार अंमलबजावणी.
  • १७) स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी.

राज्यातील शाळांमध्ये या तारखे पासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत मोहीम – 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. अभियानाच्या कार्यदिशांमध्ये इयत्ता नुसार अभ्यास , वर्ग खोल्यां, स्वच्छतागृहांची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता, शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आणि पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग यावर भर देण्यात आला आहे.

हे वाचा: Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली २६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत या अभियानाचा निर्णय घेण्यात आला. 

  • अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसांत प्रत्यक्ष शाळा भेटी होणार आहेत,
  • त्यानंतरच्या ६ दिवसांत आवश्यकतेनुसार सुधारणा आणि उपाययोजना करण्यात येतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply