Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?

  • Post author:
  • Post last modified:July 27, 2024
  • Reading time:2 mins read

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6, तर पदवीधरांना 10 हजार मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde: विद्यार्थ्यांसाठी व पदवीधरांसाठी मोठी घोषणा… काय आहे ?

एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एकादशी दिनानिमित्त ही घोषणा केलीय.12 वी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय, तर डिप्लोपा झालेल्यालाहजार तर पदवी केलेल्या तरुणाला १० हजार असे दर महिन्याला मिळणार आहेत. पण! ही योजना फक्त महाराष्ट्रात राबवली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी नवी योजना जाहीर केलीय.

हे वाचा: शिक्षकांना करावे लागणार जास्त काम पण का ? लाडकी बहीण योजनेच्या कामाचे शिक्षकांना आदेश…

ही योजना फक्त महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा. तो 12 वी उत्तीर्ण हवा. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे बँक खाते  हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे. युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्या अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थी युवकांना खात्यावर पैसे येतील.

या योजनेंतर्गत 10 लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस सरकारचा आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. युवकांना सक्षम करण्यासाठी आणि स्वत: च्या पायावर उभं राहण्यात मदत करण्यासाठी ही योजना काम करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे

हे वाचा: एकनाथ शिंदे : किती झाल आहे एकनाथ शिंदे यांच शिक्षण, माहीत आहे का? आज माहीत करून घ्या


Source: News Channel

हे वाचा:  शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply