शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं…

  • Post author:
  • Post last modified:July 16, 2024
  • Reading time:2 mins read

शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आदेश शिक्षिकेला मॅडम नाही तर दीदी म्हणायचं, याबरोबरच शाळेत शिक्षकांना जीन्स टीशर्ट घालणं बंद.

 शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं…

शिक्षिकेला मॅडम नाही तर दीदी म्हणायचं तर सरांना गुरुजी म्हणायचं, तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनी नमस्ते किंवा जयहिंद म्हणण्याचे आहे. याशिवाय शाळेच्या वेळेत कोणत्याही शिक्षकाने पान, सिगारेट, तंबाखू यांचं सेवन करु नये, इतकंच नाही तर जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक बाटल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळेत यापुढे कोणत्याही पुरुष किंवा महिला शिक्षकांनी जीन्स आणि टीशर्ट घालून येऊ नयेत असे सांगनयात आले आहे. . शाळा हे मंदिरासारखे आहे, त्यामुळे आपण मंदिरात जे आचरण करतो ते शाळेतही पाळले पाहिजे, असं शिक्षण अधिकारी अलक शर्मा यांनी सांगितलं. व तसेच वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बूट किंवा चप्पल घालून प्रवेश करु नये, वर्गाबाहेर बूट किंवा चप्पाल काढून ठेवण्यासही सांगण्यात आलं आहे. 

विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत असे उपक्रम राबवत आहेत.  शाळांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचं पालन करणे खूप गरजेचे आहे. (aaplay) संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं अलका शर्मा यांनी म्हटलंय. यामुळे मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आदर वाढेल असा दावा त्यांनी केला आहे. 


Source

हे पहा

सीए : खूप आवघड आहे का ? पहा काय मन्हाला  हिमांशु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply