शाळेतील एक वर्गखोली, व संगणक, इंटरनेट सुविधा व बालवाडी शिक्षकांपासून इयता दहावीपर्यंत सर्व शिक्षकांना करावे लागणार रोटेशन पद्धतिने काम.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत हे आपलेला माहीत आहे पण ! या योजनेच्या पात्र महिलांचे अर्ज मुदतीत भरण्याचे काम राज्यभरात जोरात सुरु आहे. मात्र आता कमी वेळात जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचली जावी म्हणून शिक्षकांना हाताखाली घेतले जात आहे.
सध्या गावागावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांची गर्दी सुरु आहे. काही गावात संस्था महिलांचे अर्ज भरुन घेण्यास मदत करीत आहेत तसेच शिक्षक सुद्धा आता मदत करणार आहेत.
कार्यक्षेत्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेत महिलांची नोंदणी कमी वेळात आणि तत्काळ व्हावी यासाठी उप आयुक्त (शिक्षण) शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश काढले आहेत. येत्या ३१ ऑगस्ट २०२४ या या कालावधीपर्यंत ही योजना यशस्वीपणे राबवण्याचेही म्हटले आहे. यामुळे आता शिक्षकांनी कमाल सुरुवात करावी लागणार आहे .