त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे 47 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्रिपुरा राज्यातून (टीएसएसईएस) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या राज्यातील एका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गंभीर प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी एकाच इंजेक्शनचा वापर करून ड्रग्सचे सेवन (Drug abuse using a single injection) केल्याने या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले आहे.
(TSSES) चे सहसंचालक सुभ्रजित भट्टाचार्य म्हणाले की “आम्ही आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांची एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंदणी केली आहे. तर 47 जणांना या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तर अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून येते की दररोज एचआयव्हीची जवळपास पाच ते सात नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत.
हे वाचा
नोंदणीसाठी मुदतीत वाढ : MCA CET 2024 पहा काय कारण ?